Gopalgad-fort-Guhagar
ईतिहासाचा मूक साक्षीदार गोपाळगड गुहागर-दाभोळच्या अथांग समुद्रकिनार्यावरील इतिहासाचा साक्षीदार असलेला ‘गोपाळगड’हा पर्यटक व गड-किल्ले प्रेमिंसाठी कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक सुंदर पर्यटन स्थळ दाभोळ आणि जंजनवेलच्या मध्यावर असलेल्या वसिष्ठि नदीच्या खाडीपर्यंत पोचायचं. या खाडीच्या तोंडाशी दक्षिणेला वेलदूर असून तेथून अंजनवेल फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. या अंजनवेल येथील गोपाळगड हा दाभोळच्या खाडीवर सक्त पहारा देणारा इतिहासाचा मूक साक्षीदार उभा आहे. अंजनवेल दाभोळ हा सारा परिसर आज एन्रॉनच्या तडाख्यात सापडल्याने येथील वनश्रीवर थोडा अन्याय झाला आहे. सुमारे सात एक क्षेत्रफळाच्या जागेवर असलेला गोपाळगड डोंगर टेकडीच्या माथ्यावर विराजमान असून तेथून बरूजांची भक्कम तटबंदी थेट समुद्र किनार्यापर्यंत आहे. हा भाग पडकोट म्हणून ओळखला जातो. वरचा किल्ला, बालेकोट, पडकोट अशा तीन भागांचा मिळून हा देखणा दुर्ग तयार झाला आहे. किल्ल्याच्या तटावर फारशी भाषेतील शिलालेख असून तो सातव्या शतकामधील आहे. बारा बुरूज,पूर्व-पश्चिम असे मुख्य दरवाजे असलेल्या या किल्यात किल्लेदाराच्या वाड्याच्या जोत्यांचे अवशेष...
Comments
Post a Comment