Konkan is one a scenic journey - (कोकण एक निसर्गरम्य प्रवास)

असं आहे आपलं कोकण


कोकण म्हटलं की, उंचच उंच आणि झावळ्यांच्या नारळी-पोफळींच्या बागा, त्यांच्या छत्राखाली सुस्तपणे पसरलेली आंबे-फणसांचे डेरेदार वृक्ष, आळसावून बसलेली काजूची झाडं, छोट्या-मोठ्या टेकड्यांना वळसे घालून किंवा त्यांच्या अंगाखांद्यावरून नागमोडी वळणं पार करणारे तांबड्या मातीचे रस्ते व पायवाटा असे एक मनमोहक दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. निसर्गाने मुक्तहस्ते दिलेले पर्जन्य वरदान, घनदाट वनसंपत्ती, विस्तीर्ण समुद्रकिनारा यामुळे कोकण हा महाराष्ट्राच्या शिरपेचातील तुरा ठरला आहे, असे म्हटल, तर अतिशयोक्ती ठरणार नाही! अशा या निसर्ग सौंदर्याने नकशिकांत नटलेल्या कोकणाचा मी केलेला प्रवासाचा अनुभव दररोज आपल्या बरोबर शेअर करणार आहे. चला मग माझ्या बरोबर संस्कृती, लोककला, खाद्यसंस्कृती, निसर्ग संपदा साहित्य संपदेने काठोकाठ भरलेल्या महाराष्ट्राच्या नंदनवनाचे दर्शन घ्यायला.


Comments

Popular posts from this blog

The tourist attractions of Konkan and the folk culture (नयनरम्य सृष्टिसौंदर्याने नटलेली कोकणाची पर्यटन स्थळे आणि तिथली प्रेमळ गोडव्याने भरलेली लोक संस्कृती:)

Gopalgad-fort-Guhagar