Gopalgad-fort-Guhagar

ईतिहासाचा मूक साक्षीदार

गोपाळगड

गुहागर-दाभोळच्या अथांग समुद्रकिनार्‍यावरील इतिहासाचा साक्षीदार असलेला ‘गोपाळगड’हा पर्यटक व गड-किल्ले प्रेमिंसाठी कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक सुंदर पर्यटन स्थळ

दाभोळ आणि जंजनवेलच्या मध्यावर असलेल्या वसिष्ठि नदीच्या खाडीपर्यंत पोचायचं. या खाडीच्या तोंडाशी दक्षिणेला वेलदूर असून तेथून अंजनवेल फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. या अंजनवेल येथील गोपाळगड हा दाभोळच्या खाडीवर सक्त पहारा देणारा इतिहासाचा मूक साक्षीदार उभा आहे. अंजनवेल दाभोळ हा सारा परिसर आज एन्रॉनच्या तडाख्यात सापडल्याने येथील वनश्रीवर थोडा अन्याय झाला आहे.

सुमारे सात एक क्षेत्रफळाच्या जागेवर असलेला गोपाळगड डोंगर टेकडीच्या माथ्यावर विराजमान असून तेथून बरूजांची भक्कम तटबंदी थेट समुद्र किनार्‍यापर्यंत आहे. हा भाग पडकोट म्हणून ओळखला जातो. वरचा किल्ला, बालेकोट, पडकोट अशा तीन भागांचा मिळून हा देखणा दुर्ग तयार झाला आहे. किल्ल्याच्या तटावर फारशी भाषेतील शिलालेख असून तो सातव्या शतकामधील आहे. बारा बुरूज,पूर्व-पश्चिम असे मुख्य दरवाजे असलेल्या या किल्यात किल्लेदाराच्या वाड्याच्या जोत्यांचे अवशेष, कोठी आणि तीन विहिरी आहेत. किल्ल्याच्या भक्कम तटावरून किल्ल्याला प्रदक्षिणा घातली की, वसिष्ठी नदीचं विस्तीर्ण पात्र, एकीकडे एन्रॉनचा प्रकल्प आणि दुसर्‍या बाजूला दूरवर फेसाळणारा अंथांग महासागर असे भव्य विलोभनिय दृश्य दिसते.

वेगवेगळ्या शासकांच्या राजवटीत मूळ किल्ल्याला जोड देण्यात आलेली आहे. मूळ वरचा किल्ला विजापूरकरांनी सोळाव्या शतकात बांधला. शिवाजी महाराजांच्या इसवीसन 1660 च्या दाभोळ स्वारीच्या वेळी त्यांनी हा किल्लाही काबीज केला होता. इसवीसन 1699 मध्ये सिद्दी खैर्यतखान याने हा किल्ला जिंकला, तर इसवीसन 1744 मध्ये कुळोजी आंग्रे यांनी तो मराठेशाहीत पुन्हा दाखल केला. आंग्रे आणि पेशवे यांच्या वितुष्टामध्ये इसवी सन 1755 मध्ये तो पेशव्यांच्या ताब्यात आला. पानिपतच्या युद्धानंतर उद्भवलेल्या सदाशिवराव भाऊंच्या तोतया प्रकरणातील तोतयाच्या ताब्यात हा किल्ला जवळजवळ सहा महिने होता. पुढे इसवी सन 1818 पासून अखेरपर्यंत ब्रिटिशांच्याच ताब्यात होता

गोपाळगडला जाण्यासाठी रत्नागिरीहून गुहागर अशी एस. टी. सेवा किंवा मुंबईहून थेट गुहागर एस.टी. बस पकडून जावे लागते. गुहागरहून थेट अंजनवेलपर्यंत बससेवा उपलब्ध आहे. मुक्कामासाठी अंजनवेल येथे लॉजिंग बोर्डिंग फारशी नसली तरी दाभोळ येथे भरपूर लॉजिंग आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Silent witness of history

Gopalgad

Gopalgad, a witness to the history of Guhagar-Dabhol's endless beaches, is a beautiful tourist destination surrounded by nature in the Konkan for tourists and fort lovers.

We used to reach Vashishti river creek between Dabhol and Ajnavel. The mouth of this creek is south of Veldur and Anjanvel is only half an hour away. Gopalgad in Anjanvel is a silent witness of history standing guard over Dabhol creek. The whole area of ​​Anjanvel Dabhol was found to be in the throes of Enron today, which has caused some injustice to the forest here.
Gopalgad, situated on an area of ​​about seven acres, is perched on the top of a hill, from where the strong fortifications of the bastions extend directly to the shore. This part is known as Padkot. This beautiful fort is made up of three parts namely Upper Fort, Balekot and Padkot. There is a Persian inscription on the fort wall which dates back to the 7th century. With twelve towers, east-west main gates, the fort has the remains of a fortified castle, a mansion and three wells. As you walk around the fort from the fort's fortifications, you can see the vast expanse of the Vashishti River, Enron's project on one side and the endless ocean flowing in the distance on the other.


The original fort has been attached to the reigns of different rulers. The original fort was built by Bijapurkar in the 16th century. He also captured the fort during Shivaji Maharaj's invasion of Dabhol in 1660 AD. The fort was conquered by Siddi Khairyatkhan in 1699 AD, while it was recaptured by Kuloji Angre in 1744 AD. It came under the control of Peshwa in 1755 AD between Angre and Peshwa. The fort was under the control of Totaya for about six months in the case of Sadashivrao Bhau's totaya which arose after the battle of Panipat. It was under British rule from 1818 to the end

From Ratnagiri to Guhagar to go to Gopalgad. T. Service or direct from Mumbai to Guhagar ST. You have to catch the bus. There is a direct bus service from Guhagar to Anjanvel. Although there is not much lodging boarding at Anjanvel for the stay, there are plenty of lodging at Dabhol.

Comments