Khemkalki Mandir- Konkan Ratnagiri- खेमकालकी मंदिर

कोकणातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावातील खेमकालकी मंदिर समुद्राच्या किनारी वसलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ :

अंदाजे 400 वर्षांपूर्वीचा काळ, हिंदवी स्वराज्याचा विचार घेऊन एक किरण या पृथ्वी तलावर अवतरला आणि बघता बघता महाराष्ट्राच्या मनामनात पसरला. राजे शहाजी भोसले निजामाच्या सेवेत असताना कोकणचा राजापूर-रत्नागिरी हा भाग त्यांच्या वतनदारीत येत होता. शहाजी राजे यांनी जेव्हा निजामशाही सोडली आणि अदिलशाहीला जावून मिळाले, तेव्हा त्यांच्या सैन्यातील अंबाजी झिंबर नावाचा त्यांचा विश्वासू शिलेदार त्यांच्या सोबत होता, तो अतिशय लढवय्या होता. शहाजी राज्यांच्या विश्वासू माणसातला तो एक होता, याचा उल्लेख ‘शिवचरित्र एक सिद्धांत’ या पुस्तकात आपणास पहायला मिळतो. अंबाजी झिंबर हे मुळचे गोवा कर्नाटक सिमेवर असलेल्या कारवार या प्रदेशातले, कारवारच्या दुर्गम भागात त्याकाळी वसलेले शे-दोनशेची वस्ती असलेले ‘झंबुर’ हे छोटेशे गाव, त्या गावात असलेल्या ‘अंबा जोगलाई’ देवीचे ते मोठे भक्त होते. किंबहूना अंबाजींच्या वडीलांनी आपल्या मुलाचे नाव या देवीच्या नावावरूनच ‘अंबाजी’ असे ठेवले असावे.

पुढे शिवाजी राजांचा जन्म झाला आणि शहाजी राजानी पुणे परगण्यातील जहागीर शिवाजी राजांना दिली आणि त्यांच्या बरोबर आपल्या मर्जितील खास माणसेही जिजाबाई-शिवाजी राजांच्याh बरोबर पाटवली. त्याच्यातलेच हे ‘अंबाजी झिंबर’ शहाजी राज्यांच्या ताब्यात असलेल्या कोकण किनारपट्टीच्या काही टेहळणी बुरूजांचे व आजुबाजुच्या प्रदेशाचे रक्षण करणे व प्रसंगी प्रत्यक्षात लढाईला उतरणे गुप्त संदेश राजांन पर्यंत पोचविण्याचे मुख्य काम अंबाजी झिंबर हे त्यांच्या साथीदारांसह अगदी बेमालूम पणे करत होते. इ.सन 1590 च्या सुमारास अंबाजी झिंबर आपल्या कुटूंब कबिल्यासहीत खेमदेवाच्या या पवित्र भूमित वस्ती करून राहिले. शेती करणे, राजाचे बोलावने आले की लढाईला तयार होणे तसेच या प्रदेशाचं रक्षण करणे ही जबाबदारी त्यांच्यावर होती. अंबाजीं बरोबर बडबे, बाडगोड, मांडवे, आंग्रे, घाणे व गावण अशी माणसं ही होती. अंबाजीना सात मुलगे आणि दोन मुली होत्या. त्यांचा थोरला मुलगा हरीराम हा बाराही महिने शेतीच्या कामात गुंतलेला असायचा बाकी सहाजण शिवाजी महाराज्यांच्या सैन्य दलात होते.

शिवाजी महाराजांनी स्व:ता राज्यकारभार हाती घेईपर्यंत अगदी दाभोळ पर्यंतचा प्रदेश गोव्याच्या पोर्तुगीजांनी काबीज केला होता. अंबाजींच्या अखेरच्या काळत अंदाजे इ सं. 1600 मध्ये स्वयंभू शंभूमहादेव खेमदेवाच्या रूपाने आणि आदिमाया पार्वती कालकीच्या रूपाने प्रत्यक्षात अवतरले. 

श्रावण महिना होता शेतीची काम आटोपली होती. हरीरामने नेहमीप्रमाणे आपली गुरे गाय-बैल चरण्यासाठी सोडली होती. त्यामध्ये नुकतीच व्यायलेली ‘भागी’ नावाची गाय भगवलीच्या जाळीत नेहमी जात असे. जेव्हा ही गुरे परत गोठ्यात जात तेव्हा ‘भागी’च्या ओटीपोटात आपल्या वासराला पाजायला पान्हाच नसायचा तिचं ओटी पोट आटलेलं असायचं. ही गोष्ट हरीरामच्या नजरेतून सूटली नाही. त्याला प्रश्न पडला नेमकं हे काय आहे? याचा छडा लावण्याचा त्याने प्रयत्न केला. त्या दिवशी श्रावण सोमवार होता हरीरामने गुरे सोडली पण आज तो त्या आपल्या आवडत्या ‘भागी’ नावाच्या गायीवर नजर ठेवून होता. आणि एक अद्भूत अनुभूतीचा साक्षात्कार झाला ती गाय नेहमीप्रमाणे त्या भगवलीच्या जाळीत गेली. हरीराम ही थोड्यावेळाने तिच्या पाठीमागून गेला. तिथे त्याने जे पाहीले ते पाहून तो झिंबर धन्य झाला कृतार्थ झाला. ‘भागी’ आपला पान्हा (दूधाची धार) त्या जाळीतील दगडावर सोडून शांत, निर्विकार पणे उभी होती. शंभूमहादेवाच्या पिंडीवर होणारा तो दुधाचा अभिषेक! हे अदभूत दृश्य पाहून हरीराम या स्वयंभू अवताराच्या समोर आपलं देहभान विसरून नतमस्तक झाला. त्याचा आनंद हा अव्यक्त, नि:शब्द होता. तसा तो धावतच ही बातमी सांगायला आपल्या वडिलांकडे आला. आजाराने अंथरूनाला खिळलेले अंबाजी ही बातमी ऐकताच अंथरूणावरून ताडकन उठले आणि त्यांचा मुखातून शब्द बाहेर पडले ते हरीरामला म्हणाले ’पोरा! आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी आज या सरखेल दर्यासारंगाने स्वयंम शंभूमहादेवाने खेमाच्या रूपाने अवतार घेतला आहे. आज ही भूमी पावण झाली आपलं जीवन धन्य झाले.’

या अवतारासाठी ‘भगवत गीता’ म्हणजेच भगवलीच्या जाळीची निवड प्रगट होण्यासाठी या देवतेने केली पवित्र गोमातेच्या मार्फत हे सर्व घडवून आणलं हे एक शाश्वत सत्य आहे. एक असा साक्षात्कार जो सदैव या जिवसृष्टीच्या कल्याणासाठी या भूमित आपल्या भक्तांना कृपेची सावली देत उभा आहे.

इ.सन.1654 चा तो काळ होता. गोव्याचे पोर्तूगीज आणि जंजिर्‍याच्या सिद्धीने कोकण किनारपट्टीवर जूलूम जबरदस्तीने रयतेचा छळ मांडला होता शिवाजी राजांना रयतेचे हे हाल पहावंले नाहीत. जर स्वराज्य राखायचे असेल, त्याचे रक्षण करायचे असेल तर स्वराज्याचा समुद्रकिनारा हा सुरक्षित राहिला पाहिजे! हा विचार मनात येताच महाराजांनी कोकण स्वारीची तयारी केली. मालवण मार्गे ते या मोहीमेवर उतरले, अंबाजींचे नुकतचं निधन झाले होते, महादेव, बाळू, भिकू आणि देवराम यांच्या पर्यंत ‘सिद्दीच्या आक्रमणासाठी तयार रहा’ हा शिवाजी महराजांचा संदेश येऊन केव्हाच पोहचला होता. अंबाजीची ही चारी मुलं आपल्या सहकार्‍यांसह लढाईसाठी सज्ज झाली होती. स्वयंभू अवतरलेल्या खेमदेवाला रक्ताचा अभिषक करून यांनी शपत घेतली कि, ‘सिद्दिचं पारिपत्ये करूनच तुझा उत्सव साजरा करू‘. प्रत्यक्ष लढाईला तोंड फूटल होतं, जजिंर्‍याचा सिद्दी मागे हटत नव्हता. निखराची झुंज चालू होती. लढाई निर्णायक होणार राजे सिद्दिचा खात्मा करणार येवढ्याच अवधीत गोव्याच्या पोर्तुगीजांची मदत पालशेत बंदरातून दाभोळ मार्गे सिद्दीला मिळू लागली. आणि इथेच या चार झिंबर भावंडानी आपल्या जिवाची बाजी लावून पराक्रमाची शर्त केली सिद्दीला मिळणारी पोर्तुगीजांची ही रसद तोडण्याची महत्वपूर्ण कामगिरी या भावंडनी यशस्वीपणे पार पाडली. ही लढाई सरखेल मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली लढली जात होती. पालशेत बंदरात उतरलेले पोर्तुगीजांचे अनेक तराफे, होड्या गलबते समुद्रात झिंबर आणि त्यांच्या सैन्ये तुकडीने बूडवली आणि त्यांची लूट करून सिद्दीला मिळणारी रसद मोठ्या पराक्रमाने झिंबर बंधूनी जीवाची बाजी लावून नेस्तनाभूत केली. त्यामुळेच सिद्दीने आपला जीव मुटीत धरून या दाभोळ गुहागर भागातून पळ काढून त्याने जंजिर्‍याला आश्रय घेतला. शिवाजी महाराजांच्या कोकण किनारपट्टीवरील लढल्या गेलेल्या सर्व लढायांपेक्षा ही लढाई खूपच अवघड होती. अखेर राजांना यश मिळाले, ही कामगिरी इतिहासकारांकडून दुर्लक्षित राहिली हे शल्य आहेच, याचा पुसटसा नाममात्र उल्लेख शिवचरित्रांच्या काही पुस्तकात पहायला मिळतो. शिवाजीराजांचं या लढाईनंतर या भागात पुन्हा वर्चस्व प्रस्थापित झालं. याच वेळी अजंनवेलच्या गोपाळगडांसारख्या जलदुर्गांची निर्मिती करून महाराजानी दर्यावर्धी आरमाराचा भगवा झेंडा मोठ्या डौलाने कोकण किणारपट्टीवर फडकवला. या लढाईत अंबाजींचा धाकटा मुलगा महादेव हा पोर्तुगीजांच्या लढाईत जबर जखमी झाला त्याच्यातच त्याचं निधन झालं. महाराजांनी या भावंडाना सन्मानाने गडावर बोलावून त्यांचा आदर सत्कार सन्मान केला. महादेव स्वराज्यासाठी कामी आला आम्हाला त्याचा अभिमान आहे या शब्दात त्यांनी या भावंडाच सांत्वन केलं. या तीन भावंडानी खेमाची स्वयंभू प्रगट होण्याची कथा महाराजांना याच समयी कथन केली ती हे ऐकून प्रत्यक्ष महाराज ही भारावून गेले. या झिंबर भावंडांच्या पराक्रमाची दखल घेत शिवाजी राजांनी सोन्याचं कडं, काही होन देऊन त्यांची सन्मानाने रवानगी केली. ‘सखळ समृद्ध या किणारपट्टीच रक्षण करून हे स्वराज्य राखा !  स्वराज्य वाढवा’. हा संदेश महाराजांनी या भावंडाना आणि त्यांच्या सहकार्‍यांना दिला व या खेमाचा (महादेवाचा) जागर गोंधळ मांडा महारांज्याच्या ह्या भेटी नंतरच वचना प्रमाणे या खेमाचा शंभूमहादेवाचा पहिला महागोंधळ उत्सव इ.सन. 1654 साली या झिंबर बंधूनी घातला तिथ पासूनच या उत्सवाची परंपरा सूरू झाली. ती आज 350 वर्ष, या डिसेंबर 2017 च्या जिर्णोद्धार सोहळ्या पर्यंत अविरत चालू आहे. ही या देवस्थानावरच्या अतुट श्रद्धेचीच किमया आहे, यात काहीच शंका नाही. ती पुढील हजारो वर्ष अशीच चालू राहिले हे शाश्वत सत्य येणारा भविष्यकाळ नक्कीच अधोरेखीत करील.

संदर्भ : ‘श्री खेमकालकी एक ऐतिहासिक साक्षात्कार’ या शोध प्रबंधातील खेमकालकी विषयीची ही थोडीशी माहिती या जिर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने आपणा भक्तांच्या माहितीसाठी इथे मांडण्यात आली आहे. आपल्या मनाला ती भक्तीमय समाधान देवो हिच खेमकालकीच्या चरणी प्रार्थना.

‘जय  श्री खेमकालकी’

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Khemkalaki Temple in Palshet village in Guhagar taluka of Konkan.

About 400 years ago, a ray of light descended on the earth with the idea of ​​Hindavi Swarajya and spread in the minds of Maharashtra. While King Shahaji Bhosale was in the service of the Nizam, the Rajapur-Ratnagiri part of the Konkan was coming under his jurisdiction. When Shahaji Raje left Nizamshahi and joined Adilshahi, he was accompanied by his faithful Shiledar named Ambaji Zimbar in his army, who was very militant. He was one of the faithful men of the Shahaji kingdoms, as mentioned in the book 'Shivacharitra Ek Siddhant'. Ambaji Zimbar was originally from Goa, a small village in the Karwar region on the Karnataka-Karnataka border, with a population of 100-200 at that time in the remote area of ​​Karwar. In fact, Ambaji's father may have named his son 'Ambaji' after the goddess.

Later Shivaji Raja was born and Shahaji Rajani gave Jahagir Shivaji Raja of Pune Pargana and along with him a special man of his choice along with Jijabai-Shivaji Raja. Ambaji Zimbar, along with his comrades, was unwittingly carrying out the main task of protecting some of the watchtowers on the Konkan coast and the surrounding region, which was under the control of the Shahaji kingdoms, and conveying the secret message to the Rajans. Around 1590, Ambaji Zimbar along with his family clan settled in this holy land of Khemdev. He was responsible for farming, preparing for battle at the behest of the king, and protecting the region. Along with Ambaji, there were people from Badbe, Badgod, Mandve, Angre, Ghane and Gavan. Ambajina had seven sons and two daughters. His eldest son Hariram was engaged in farming for twelve months and the other six were in Shivaji Maharaj's army.

Until Shivaji Maharaj took over the reins of government, the territory up to Dabhol was occupied by the Portuguese of Goa. In the last period of Ambaji, approximately etc. In 1600, Swayambhu Shambhu Mahadev actually came in the form of Khemdev and Adimaya Parvati in the form of Kalki.

It was Shravan month and farming was in full swing. Hariram had left his cattle to graze as usual. The newly weaned cow named 'Bhagi' used to go to Bhagwali's net. When the cattle went back to the barn, Bhagi had no stomach to feed her calf. This story did not escape Hariram's notice. He wondered what exactly it was. He tried to figure it out. It was Shravan Monday that day. Hariram released the cattle but today he was keeping an eye on his favorite cow named 'Bhagi'. And a wonderful experience was realized. The cow went into the trap of that saffron as usual. Hariram followed her for a while. Zimbar was blessed to see what he saw there. ‘Bhagi’ stood quietly, unmoved, leaving her leaf (edge ​​of milk) on the mesh stone. The anointing of milk on the pindi of Shambhumahadeva! Seeing this wonderful sight, Hariram forgot his consciousness and bowed before the self-incarnate incarnation. His happiness was unexpressed, silent. He ran to his father to tell him the news. Ambaji got up from the bed as soon as he heard the news that he was bedridden due to illness and words came out of his mouth and he said to Hariram, 'Enough! Today, Shambhu Mahadeva himself has taken incarnation in the form of a tent to protect his devotees. Today this land has become pure and our lives have been blessed. '

It is an eternal truth that this deity did all this through the sacred Gomate to reveal the ‘Bhagwat Gita’ i.e. the selection of the Bhagwali net for this incarnation. An enlightenment that always stands in this land for the welfare of the living beings, giving shade to His devotees.

It was the year 1654. The Portuguese of Goa and the achievements of Janjirya had forcibly persecuted the ryots on the Konkan coast. If we want to keep Swarajya, if we want to protect it, then the beach of Swarajya must be safe! As soon as this thought came to his mind, Maharaj prepared for the Konkan invasion. He embarked on this expedition via Malvan, Ambaji had recently passed away, Shivaji Maharaj's message 'Be ready for Siddi's attack' had reached Mahadev, Balu, Bhiku and Devram. These four children of Ambaji were ready for battle with their comrades. After anointing Khemdev with blood, he swore, "We will celebrate your festival only after the demise of Siddhi." The actual battle was in full swing, and Jajinra's success was not going away. The spark was going on. The battle will be decisive. King Siddi will be eliminated. At the same time, Siddi started getting help from the Portuguese of Goa via Palshet port via Dabhol. And it was here that the four Zimbar brothers risked their lives for the victory. The brothers successfully accomplished the important task of breaking the Portuguese supply to Siddi. This battle was being fought under the leadership of Sarkhel Mayanak Bhandari. The Portuguese landed at the port of Palshet

Many rafts, boats and ships were sunk in the sea by Zimbar and his army, and by plundering them, Siddi's supplies were destroyed by the Zimbar brothers at great risk. That is why Siddi took his life and fled from the Dabhol Guhagar area and took refuge in Janjirya. This battle was more difficult than all the battles fought by Shivaji Maharaj on the Konkan coast. It is a pity that the kings finally got success, this achievement was ignored by the historians, this is only mentioned in some books of Shivacharitra. After this battle of Shivaji Raja, dominance was re-established in this area. At the same time, by constructing water forts like Gopalgad of Ajanvel, the saffron flag of the Maharaja's fleet was hoisted on the Konkan coast. In this battle, Ambaji's youngest son Mahadev was severely wounded in the battle of the Portuguese and died in it. Maharaj summoned these brothers to the fort and paid their respects. He consoled these brothers by saying that Mahadev is working for Swarajya and we are proud of him. At the same time, these three brothers narrated the story of Khema's self-disclosure to Maharaj. Noticing the prowess of these Zimbar brothers, Shivaji Raja honorably dispatched them with gold earrings and some hon. ‘Keep this Swarajya by protecting this prosperous coast! Increase self-government '. This message was given by Maharaj to these brothers and their colleagues and this camp (Mahadeva's) awakened confusion. The tradition of this festival started from the date the Zimbar brothers wore it in 1654. It is 350 years old today, continuing uninterrupted until this December 2017 restoration ceremony. There is no doubt that this is the alchemy of unwavering faith in this temple. The fact that it will continue for thousands of years to come will surely underscore the eternal future.

References: Here is a little information about Khemkalaki in the dissertation 'A Historical Interview of Shri Khemkalaki' for the information of our devotees on the occasion of this restoration ceremony. Pray at the feet of Khemkalaki to give that devotional satisfaction to your mind.

‘Jai Shree Khemkalaki’

Comments

Popular posts from this blog

Gopalgad-fort-Guhagar