Posts

Showing posts from January, 2021

Gopalgad-fort-Guhagar

Image
ईतिहासाचा मूक साक्षीदार गोपाळगड गुहागर-दाभोळच्या अथांग समुद्रकिनार्‍यावरील इतिहासाचा साक्षीदार असलेला ‘गोपाळगड’हा पर्यटक व गड-किल्ले प्रेमिंसाठी कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक सुंदर पर्यटन स्थळ दाभोळ आणि जंजनवेलच्या मध्यावर असलेल्या वसिष्ठि नदीच्या खाडीपर्यंत पोचायचं. या खाडीच्या तोंडाशी दक्षिणेला वेलदूर असून तेथून अंजनवेल फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. या अंजनवेल येथील गोपाळगड हा दाभोळच्या खाडीवर सक्त पहारा देणारा इतिहासाचा मूक साक्षीदार उभा आहे. अंजनवेल दाभोळ हा सारा परिसर आज एन्रॉनच्या तडाख्यात सापडल्याने येथील वनश्रीवर थोडा अन्याय झाला आहे. सुमारे सात एक क्षेत्रफळाच्या जागेवर असलेला गोपाळगड डोंगर टेकडीच्या माथ्यावर विराजमान असून तेथून बरूजांची भक्कम तटबंदी थेट समुद्र किनार्‍यापर्यंत आहे. हा भाग पडकोट म्हणून ओळखला जातो. वरचा किल्ला, बालेकोट, पडकोट अशा तीन भागांचा मिळून हा देखणा दुर्ग तयार झाला आहे. किल्ल्याच्या तटावर फारशी भाषेतील शिलालेख असून तो सातव्या शतकामधील आहे. बारा बुरूज,पूर्व-पश्चिम असे मुख्य दरवाजे असलेल्या या किल्यात किल्लेदाराच्या वाड्याच्या जोत्यांचे अवशेष...

Khemkalki Mandir- Konkan Ratnagiri- खेमकालकी मंदिर

Image
कोकणातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावातील खेमकालकी मंदिर समुद्राच्या किनारी वसलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ : अंदाजे 400 वर्षांपूर्वीचा काळ, हिंदवी स्वराज्याचा विचार घेऊन एक किरण या पृथ्वी तलावर अवतरला आणि बघता बघता महाराष्ट्राच्या मनामनात पसरला. राजे शहाजी भोसले निजामाच्या सेवेत असताना कोकणचा राजापूर-रत्नागिरी हा भाग त्यांच्या वतनदारीत येत होता. शहाजी राजे यांनी जेव्हा निजामशाही सोडली आणि अदिलशाहीला जावून मिळाले, तेव्हा त्यांच्या सैन्यातील अंबाजी झिंबर नावाचा त्यांचा विश्वासू शिलेदार त्यांच्या सोबत होता, तो अतिशय लढवय्या होता. शहाजी राज्यांच्या विश्वासू माणसातला तो एक होता, याचा उल्लेख ‘शिवचरित्र एक सिद्धांत’ या पुस्तकात आपणास पहायला मिळतो. अंबाजी झिंबर हे मुळचे गोवा कर्नाटक सिमेवर असलेल्या कारवार या प्रदेशातले, कारवारच्या दुर्गम भागात त्याकाळी वसलेले शे-दोनशेची वस्ती असलेले ‘झंबुर’ हे छोटेशे गाव, त्या गावात असलेल्या ‘अंबा जोगलाई’ देवीचे ते मोठे भक्त होते. किंबहूना अंबाजींच्या वडीलांनी आपल्या मुलाचे नाव या देवीच्या नावावरूनच ‘अंबाजी’ असे ठेवले असावे. पुढे शिवाजी राजांचा जन्म झाला आणि श...

The tourist attractions of Konkan and the folk culture (नयनरम्य सृष्टिसौंदर्याने नटलेली कोकणाची पर्यटन स्थळे आणि तिथली प्रेमळ गोडव्याने भरलेली लोक संस्कृती:)

Image
नयनरम्य सृष्टिसौंदर्याने नटलेली कोकणाची पर्यटन स्थळे आणि तिथली प्रेमळ गोडव्याने भरलेली लोक संस्कृती: नयनरम्य सृष्टिसौंदर्य, इतिहासाचे बुलंद साक्षीदार गड-किल्ले, देवत्वाची मंगलभावना निर्माण करणारी मंदिरे, निसर्गाच्या अनुपम आविष्कारात वसलेले विविध समुद्रकिनारे यांनी नटलेलेल्या कोकणात ऋतुंपरत्वे निसर्गाची विविध रूपं दिसतात. त्यामुळे या प्रदेशात तिन्ही ऋतुंमध्ये पर्यटन बहरलेले असते. पर्यटन क्षेत्रामध्ये विस्तार आणि विकासाच्या अमर्याद असलेल्या क्षमता, पर्यटनाबाबत लोकांची बदललेली मानसिकता आणि आर्थिक स्त्रोतात वृद्धी होण्याची हमखास खात्री या तीन बाबींना केंद्रभूत ठेवून, धोरणं आखली जात आहेत. त्याचे अतिशय उत्तम परिणाम दिसून येत आहेत. कोकणी माणसाचा कणखरपणा, निधडेपणा, राकटपणा ही त्याला सह्याद्रिच्या भक्कम रांगांकडून मिळालेली देणगी आहे. तर चिकटपणा, काटकपणा इतल्या झाडा-झुडपांनी त्याला बहाल केला आहे. इथल्या नद्यांनी त्याला अडथळे बाजूला सारून सतत पुढे जायची प्रेरणा दिली आहे. त्याची दृष्टी विशाल केली आहे. म्हणूनच निसर्गाशी कोकणी संस्कृतीचे अतूट नाते आहे. एकूणच कोकणाला अभिमान वाटावी, अशी परंपरा लाभली आ...